गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या आता काहीशी कमी होत स्थिरावली आहे. टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट अर्थात चाचण्यांच्या तुलनेत दिसणारे रुग्णसंख्येचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. पुढचे काही दिवस ही घट अशीच कायम राहिली तरच दुसरी लाट कमी होण्याची चिन्ह दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुण्यात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. पण आता मात्र गेल्या काही दिवसात यामध्ये दिलासा मिळालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २१ ते २१ टक्यांपर्यंत आला आहे. ३० टक्क्यांच्या वर गेलेले हे प्रमाण कमी होणे ही नक्कीच दिलासादायक बाब ठरत आहे.
महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले, गेल्या ४-५ दिवसांत हा रेट कमी होऊन प्रमाण स्थिर झाले आहे. साधारण १० ते १५ दिवस हे प्रमाण असेच राहिले तर तो दिलासा ठरेल.