शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

पुणेकरांच्या तोंडचे पाणी ‘पळणार’

By admin | Published: September 06, 2015 3:38 AM

रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी

पुणे : रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणी पुरवठा किती वेळासाठी करायचा त्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. पावसाने मारलेली दडी अशीच कायम राहिल्यास हा निर्णय होईल, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही बोलले जात नाही. दरम्यान, पाणी साठवण्यासाठी मोठे ड्रम जमा केले जात असून, त्याबरोबरच घरातील बासनात ठेवून दिलेली जुनी मोठी भांडीही पाण्यासाठी म्हणून काढली जात आहेत.महापालिकेने जाहीर केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. पुणेकरांनी त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरू केली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पाणीपुरवठ्यावर संक्रांत येणार याची पूर्वकल्पना बहुसंख्य नागरिकांना होती. मात्र सुरुवातीला ते दिवसातून एक वेळ दिले जाईल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाणीकपातीच्या निर्णयाला वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत गेल्यामुळे थेट एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यालाही तोंड देण्यास पुणेकर तयार झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे त्याबाबत मात्र त्यांच्यात नाराजी आहे. त्यासाठी प्रामुख्याने प्लॅस्टिकचे मोठे ड्रम खरेदी केले जात आहेत. ५० ते १०० लिटर पाणी त्यात साठवता येते. पाणी साठवून ठेवण्याच्या या प्रकारामुळे आता पाणी जेवढा वेळ येईल तेवढा वेळ सार्वजनिक नळांवर नागरिकांची झुंबड उडताना दिसेल. घरातील वापराविना असलेली मोठी जुनी भांडीही या निमित्ताने बाहेर काढली जात आहेत. रोज दोन वेळा पाणी मिळत असल्याने आधीच्या दिवसांचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देऊन पुन्हा नव्याने सर्व पाणी भरून ठेवण्याची सवयही आता नागरिकांनी बदलावी लागणार आहे.उद्या (रविवार) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या सणावरही पाणीकपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. दुसऱ्याच दिवशी पाणी कपात सुरू होणार असल्याने कार्यकर्त्यांकडूनही पाण्याचा वापर होण्याची शक्यता कमी आहे.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. पुणेकरांच्या तोंडचे पाणी ‘पळणार’पुणे : रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणी पुरवठा किती वेळासाठी करायचा त्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. पावसाने मारलेली दडी अशीच कायम राहिल्यास हा निर्णय होईल, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही बोलले जात नाही. दरम्यान, पाणी साठवण्यासाठी मोठे ड्रम जमा केले जात असून, त्याबरोबरच घरातील बासनात ठेवून दिलेली जुनी मोठी भांडीही पाण्यासाठी म्हणून काढली जात आहेत.महापालिकेने जाहीर केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. पुणेकरांनी त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरू केली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पाणीपुरवठ्यावर संक्रांत येणार याची पूर्वकल्पना बहुसंख्य नागरिकांना होती. मात्र सुरुवातीला ते दिवसातून एक वेळ दिले जाईल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाणीकपातीच्या निर्णयाला वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत गेल्यामुळे थेट एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यालाही तोंड देण्यास पुणेकर तयार झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे त्याबाबत मात्र त्यांच्यात नाराजी आहे. त्यासाठी प्रामुख्याने प्लॅस्टिकचे मोठे ड्रम खरेदी केले जात आहेत. ५० ते १०० लिटर पाणी त्यात साठवता येते. पाणी साठवून ठेवण्याच्या या प्रकारामुळे आता पाणी जेवढा वेळ येईल तेवढा वेळ सार्वजनिक नळांवर नागरिकांची झुंबड उडताना दिसेल. घरातील वापराविना असलेली मोठी जुनी भांडीही या निमित्ताने बाहेर काढली जात आहेत. रोज दोन वेळा पाणी मिळत असल्याने आधीच्या दिवसांचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देऊन पुन्हा नव्याने सर्व पाणी भरून ठेवण्याची सवयही आता नागरिकांनी बदलावी लागणार आहे.उद्या (रविवार) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या सणावरही पाणीकपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. दुसऱ्याच दिवशी पाणी कपात सुरू होणार असल्याने कार्यकर्त्यांकडूनही पाण्याचा वापर होण्याची शक्यता कमी आहे.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. दरम्यान, पाणीकपातीमुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध येणार असल्यामुळे त्यातून स्वच्छतेचे व त्यामधून सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली. मात्र, पाणीकपात ही अपरिहार्य बाब आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेचीही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. तसेच नदी नाले यांच्यावर जंतुनाशक पावडर वगैरे नियमितपणे फवारून महापालिकेनेही सार्वजनिक आरोग्य बिघडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. भोंडवे यांनी केले. दहीहंडीच्या सणावरही पाणी कपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, व्यावसायिकांनी आवश्यक असेल तिथेच व अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा. चांगले पाणी शिळे झाले म्हणून रस्त्यावर किंवा अन्यत्र कुठेही फेकून देऊन नये. खराब झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो सर्वांना पाणी मिळेल असाच पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे, मात्र काही तक्रार असेल तर त्यांनी आपल्या नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा.