वालचंदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:च्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी तोंडाला मास्क वापरणे गरज आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाहनचालकांनी बेशिस्तपणे तोंडाला मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिला केले.
वालचंदनगर येथील बाजारपेठेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांनी मास्क न लावल्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात धडक कारवाईची सुरुवात केली. पोलिसांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून ही कारवाई सुरू केल्यामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. हे माहीत असतानासुद्धा चुकारपणा करून मास्क न लावता मोटारसायकल, सायकलवर फिरणाऱ्या अनेक चुकारांना पोलिसांनी दंडाचा लगाम लावला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा मास्क न लावणाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी मास्क न लावण्याची कारणे व सबबी सांगितल्या परंतु पोलिसांनी कोणतीही कारणे ऐकून न घेता दंडवसुलीची कडक कारवाई केली. वालचंदनगरच्या अनेक संस्था व नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. अशा पध्दतीची कारवाई सातत्याने व्हावी, प्रत्येक आठवडे बाजारामध्येही व्हावी अशी मागणी केली. वालचंदनगर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लोकांना जागृत करण्यासाठी फलक लावावेत व लोकांना तोंडाला मास्क लावण्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने करावे अशी इच्छा पोलिसांनी व्यक्त केली. त्या फलकाद्वारे लोकांना हे नियम न पाळल्यास कडक कारवाई व दंडात्मक वसुली तसेच गुन्हा नोंदणी केली जाईल, अशी समज देण्याबाबतही सूचना द्यावी असे मत पोलिसांनी व्यक्त केले.
फोटो ओळी: वालचंदनगर येथे मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे ज्येष्ठ पोलीस सहायक मोहन फाळके, वसंत वाघोले व प्रवीण वायसे यांनी सहभाग घेतला.
२७०२२०२१-बारामती-१५-