गुलाबी थंडीसाठी पुणकरांना करावी लागणार प्रतीक्षाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 01:57 AM2018-11-13T01:57:20+5:302018-11-13T01:57:56+5:30

चक्रीवादळामुळे तापमानात चढ-उतार : ‘ओपन जिम’मध्ये गर्दी

Punkars have to wait for the pink cold ... | गुलाबी थंडीसाठी पुणकरांना करावी लागणार प्रतीक्षाच...

गुलाबी थंडीसाठी पुणकरांना करावी लागणार प्रतीक्षाच...

Next

पुणे : शहरावर पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येते़ थंडीची चाहूल लागताच पहाटे उठून व्यायाम करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ होते़ स्वेटर, कानटोप्या घालून सकाळच्या थंडगार हवेत फिरायला जाणाºयांच्या संख्येत सध्या चांगलीच वाढ झालेली दिसत आहे़ सध्या थंडीची चाहूल लागली असली, तरी दक्षिणेत आलेल्या चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवसांत ढगाळ हवामान राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर पुन्हा थंडीचा बहर सुरू होणार आहे.

हिवाळ्यात थंड वातावरणात पहाटे केलेला व्यायाम हा अनेक आजारापासून शरीराचे रक्षण करण्यास शरीराला तयार करतो, असे मानले जाते़ त्या दृष्टीने दिवाळीच्या सुट्टीबरोबर पहाटे व्यायाम करण्याच्या संख्येत वाढ होऊ लागते़ शहरामध्ये महापालिकेने नाल्यावर जवळपास प्रत्येक वॉर्डामध्ये बागा उभारल्या आहेत़ या बागांमध्ये ओपन जिम तयार करण्यात आल्या आहेत़ हजारो रुपये खर्च करून जिममध्ये जाऊन घाम गाळून आपले शरीर कमविण्याची इच्छा असली, तरी बहुसंख्यांना ते परवडत नाही़ त्यामुळे या ओपन जिमचा असे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने व्यायाम करण्यासाठी लाभ घेताना शहरात दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक बागांमध्ये ज्येष्ठ नागरिक क्लब तयार झाले आहेत़ आयुष्यात कधीही जिममध्ये न गेलेले अनेक ज्येष्ठ नागरिकही या ओपन जिममध्ये व्यायाम करताना दिसून येतात. ट्रॅकसूट घालून कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बागांमधील ट्रॅकवरून पायी चालणाऱ्यां तरुण-तरुणींची संख्या लक्षात येईल इतकी वाढलेली सध्या दिसून येत आहे. आॅक्टोबरमध्ये परतीचा प्रवास न झाल्याने दिवसा उन्हाच्या झळा, तर रात्री गारवा असा अनुभव येत होता़

पुण्यात सर्वांत कमी तापमान

दिवाळीतही सकाळी चांगलाच गारवा जाणवत होता़ काही दिवस पुण्यात राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली होती़ सध्या पुण्यात कमाल तापमान ३२, तर किमान तापमान १३ ते १४ अंशांच्या दरम्यान आहे़ ते सरासरीच्या दरम्यान आहे़
दक्षिणेत चक्रीवादळ आले असल्याने त्याचा परिणाम होऊन १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़ दिवसा व रात्रीचे तापमान अनुक्रमे ३३ व १६ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे़ त्यानंतर, पुन्हा एकदा गुलाबी थंडीचा अनुभव पुणेकरांना येणार आहे़

तमिळनाडूमध्ये चक्रीवादळ येत असून, त्याचा परिणाम होऊन पुण्यासह राज्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे़ पुढील तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा पारा खाली जाण्याची शक्यता आहे़
- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ

Web Title: Punkars have to wait for the pink cold ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे