कमळाचा घडाळ्याला धक्का

By Admin | Published: February 24, 2017 03:30 AM2017-02-24T03:30:14+5:302017-02-24T03:30:14+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या कळस-धानोरी भागात राष्ट्रवादीच्या

Push the Lotus Wheel | कमळाचा घडाळ्याला धक्का

कमळाचा घडाळ्याला धक्का

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या कळस-धानोरी भागात राष्ट्रवादीच्या घडाळ्याला धक्का देत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले आहे. फुलेनगर- नागपूरचाळ भागातही कमळ फुलले असून येरवडा परिसरात शिवसेनाला 3 जागा मिळाल्या असून एमआयएमने पुण्यात प्रथम खाते उघडले आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयात येणा-या तीन प्रभागात राष्ट्रवादीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 6 मधून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना मतदारांनी दिलेला कौल समोर आला. सकाली दहा वाजता कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. त्यात भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यात किरण जठार, अनिल टिंगरे, मारुती सांगडे यांचा समावेश आहे. तर प्रभाग 2 मधून डॉ. सिध्दार्थ धेंडे ,फरजाना शेख, शीतल सावंत विजयी झाले आहेत. शिवसेनेचे अविनाश साळवे, श्वेता चव्हाण आणि संजय भोसले यांनी विजय मिळवल्या असून एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी विजय मिळवत पुण्यात पक्षाचे खाते उघडले. तर राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह सुनील टिंगरे यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक 1 वर भाजपचे वर्चस्व
प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ मधून कळस-धानोरी परिसरातून निवडणूक लढवणा-या 13 उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरण जठार यांनी 11 हजार 830 मते घेत विजय मिळवला. त्यांनी ऐश्वर्या जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना 9 हजार 549 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1 हजार 500 मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमाक 1 ‘ब’ मध्ये मारुती सांगडे 14 हजार 560 मते घेवून विजयी झाले आहेत. सांगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विठ्ठल कोथेरे यांचा पराभव केला. कोथोरे यांना 12 हजार 150 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 1 क मधून रेखा टिंगरे यांनी भाजपच्या अलका खाडे यांचा पराभव केला. टिंगरे यांना 15 हजार 743 मते तर खाडे यांना 9 हजार 672 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 1 ड मधून अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी सर्वाधिक 18 हजार 307 मते घेवून विजय मिळवला. टिंगरे यांच्या विरोधातील उमेदवार दिनेश म्हस्के यांना आठ हजार ९९३ मते मिळाली.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच जठार, सांगडे, रेखा टिंगरे आणि बॉबी टिंगरे आघाडीवर होते. हीच परिस्थिती तिस-या फेरीपर्यंत कायम होती. मात्र, चौथ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या जाधव यांनी तब्बल ५ हजार ८६५ मते घेऊन आघाडीवर गेल्या. मात्र, गेल्या तीन फेरींचा फरक भरून काढण्यात या आघाडीचा फायदा झाला नाही.


प्रभाग क्रमांक 2 मध्ये कमळ फुलले
प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवणा-या 7 उमेदवारांमधून भाजप आरपीआय आघाडीचे प्रभाग 2 अ मधून डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनील गोगले यांचा पराभव केला. धेंडे यांना 16 हजार 198 तर गोगले यांना 11 हजार 197 मते मिळाली. पहिल्या फेरीत गोगले आणि धेंडे यांच्यात लढत होत असल्याचे दिसून आले.मात्र,दुस-या फेरीपासून धेंडे यांनी आघाडी घेत विजय मिळवला. तसेच ब मधून भाजपच्या फरजाना अय्युब शेख यांनी 11 हजार 445 मते मिळवत शिवानी माने यांचा पराभव केला. तसेच ‘क’ मधून भाजपच्या शीतल सावंत यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत स्पष्ट विजय मिळवला.तर प्रभाग क्रमांक 2 ड मधून सुनील टिंगरे यांनी सर्वाधिक 18 हजार 105 मते घेत विजय मिळवला.त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणा-या सुभाष चव्हाण आणि माजी नगरसेवक सागर माळकर यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये धनुष्यबाण; एमआयएम
शहरातील बहुतेक प्रभागात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी लढत देवून विजय मिळवला. मात्र, प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांविरोधात लढत झाल्याचे पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या महिला उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली. त्यात एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी शिवसेनेच्या तृप्ती शिंदे यांना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढ दिली.
प्रभाग क्रमांक 6 अ मधून शिवसेनेचे अविनाश साळवे, ब मधून श्वेता चव्हाण आणि ड मधून संजय भोसले यांनी विजय मिळवला आहे. साळवे यांना एमआयएमच्या शैलेंद्र भोसले यांनी लढत दिली. साळवे यांना 12 हजार 20 मते मिळाली. तर श्वेता चव्हाण यांना सायरा शेख यांनी चांगलीच लढत दिल्याचे दिसून आले. चव्हाण यांनी दुस-या फेरीत चार हजाराहून अधिक मते मिळाली. शेख यांना एवढे मोठे मताधिक्य ओलांडता आले नाही.दुसरी फेरी वगळता इतर चार फे-यांमध्ये शेख यांना प्रत्येक फेरीत एक हजारापेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून आले.चव्हाण यांनी 10 हजार 236 मते मिळाली. एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी 9 हजार 682 मते मिळवत विजय प्राप्त केला.
प्रभाग 6 ड मधून शिवसेनेचे संजय भोसले यांनी 14 हजार 904 मते मिळवत भाजपचे राजेंद्र ऐटल यांचा पराभव केला.ऐडल यांना 7 हजार 110 मते मिळाली.

मतमोजणी प्रक्रियेवर संशय,
फेर मत मोजणीची मागणी

पुणे: प्रभाग क्रमांक एक मधील मत मोजणीच्या वेळी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातील एकूण मतदान यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे मतदान यंत्रांमध्ये फरबदल झाल्याचा आरोप प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना केला. काँग्रेसचे उमेदवार रेणूका चलवादी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार ऐश्वर्या जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे फरेमतदानाची मागणी केली. प्रभाग क्रमांक एक कळस-धानोरी गटामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी फेरी निहाय मतदान जाहीर केले. त्यानुसार प्रभागामध्ये सुमारे ४३ हजार झाल्याचे सांगण्यात आले.तसेच हीच आकडेवारी प्रसारमाध्यमांनाही देण्यात आली. निकालानंतर सर्व उमेदवार आणि त्याचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडले होते. मात्र, एकूण झालेले मतदान आणि आयोगातर्फे देण्यात आलेली मतदानाची आकडेवारी यात तफावत दिसून आली.त्यामुळे रेणूका चलवादी, हुलगेश चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांनी पुन्हा मतमोजणीसाठी मतदान केंद्राकडे धाव घेतली.मात्र,तोपर्यंत दुस-या प्रभागाच्या मतमोजणीस सुरूवात झाली होती. मात्र, उमेदवारांनी ही चूल लक्षात आणून दिल्यानंतर आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या निकालाची आकडेवारी पुन्हा प्रसारमाध्यमांना देण्यात आली. त्यात ३७ हजार मतदान झाल्याचे नमुद करण्यात आले.
सर्व उमेदवारांची मतेही यात कमी दाखविण्यात आल्याचे सांगत चलवादी व जाधव यांनी मतदान प्रक्रियेवरच संशय घेण्यात आला. चलवादी आणि जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिका-यांकडे याबाबत लेखी तक्रार केली. त्यावेळी अगोदर दिलेल्या निकालपत्राची प्रत दाखविली. मात्र त्यांनी पोलिसांना पाचारण करत त्यांना काही काळ थांबविण्यात आले. प्रभाग क्रमांक १ मधील विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देत असताना अजित देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या,त्यावर निवडणूक आयोगाने 43 हजार मतदानाचे कोणतेही निकाल पत्र आम्ही दिले नसल्याचे सांगितले.

Web Title: Push the Lotus Wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.