प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:25+5:302021-01-03T04:12:25+5:30
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे ...
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना जाहीर झाला आहे. २२ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे ३१ वे वर्ष असून पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप आहे.
बंधुता साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात होणार आहे. ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक रामदास काकडे यांची स्वागताध्यक्षपदी निवड केली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष बबनराव भेगडे, संघटक हरिश्चंद्र गडसिंग, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे संमेलनाचे यशस्वी नियोजन करत आहेत, असे परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी सांगितले.