अनिधिकृत पार्किंगमुळे जेलच्या सुरक्षेला धाेका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:29 PM2018-08-29T18:29:33+5:302018-08-29T19:30:33+5:30

येरवडा कारागृहाच्या सुरक्षाभिंतीला लागून अनेक वाहने अनधिकृतरित्या लावली जात असल्याने कारागृहाच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे.

The question of safety of the prison arrives due to unauthorized parking | अनिधिकृत पार्किंगमुळे जेलच्या सुरक्षेला धाेका

अनिधिकृत पार्किंगमुळे जेलच्या सुरक्षेला धाेका

Next

पुणे : अाशिया खंडातील सर्वात माेठे कारागृह अशी अाेळख असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा अनिधिकृत पार्किंगमुळे धाेक्यात अाली अाहे. एअरपाेर्ट राेडला नागपूर चाळीच्या समाेर कारागृहाच्या भिंतीला लागून अनेक वाहने लावली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. या ठिकाणी नाे पार्किंगचे बाेर्ड लावलेले असताना देखील वाहनचालक तेथेच वाहने लावत अाहेत. त्यांच्यावर जुजबी कारवाई हाेत असल्याने पहिले पाढे पंचावन्न अशीच काहीशी स्थिती येथे पाहायला मिळत अाहे. 

    येरवडा मध्यवर्ती कारागृह हे भारतातील एक महत्तवाचे अाणि संवेदनशील कारागृह अाहे. या कारागृहात गंभीर गुन्ह्यातील अाराेपी शिक्षा भाेगत अाहेत. अाजमितीला साधारण साडेपाच हजाराहून अधिक कैदी या कारागृहामध्ये अाहेत. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची अाहे. कारागृहाच्या सर्वबाजूंनी सुरक्षा भिंत अाहे. एअरपाेर्ट राेडवरील सुरक्षा भिंतीला लागून अनेक वाहने पार्क केली जातात. प्रत्यक्षात या ठिकाणी वाहने पार्क करण्यास बंदी अाहे. तसे बाेर्डही तेथे लावण्यात अाले अाहेत. परंतु अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करुन वाहने लावत असतात. वाहतूक पाेलिसांकडून जुजबी कारवाई हाेत असल्याने नियम माेडणाऱ्यांवर जरब बसत नसल्याचे चित्र अाहे. रात्रीच्यावेळी तर सर्रास वाहने लावली जात असल्याने कारगृहाची सुरक्षा धाेक्यात अाली अाहे. त्याचबराेबर कारागृहातील कैद्यांना भेटण्यासाठी तसेच घेण्यासाठी येणारी लाेक हे कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने थांबवत असतात. त्याचबराेबर या भागात माेठी वाहतूक काेंडी सुद्धा हाेत असते. या भागात काेठेही वाहन थांबविण्यास बंदी अाहे. महिनाभरापूर्वी जामीनावर सुटलेल्या अाराेपीने एका तुरुंग अधिकाऱ्यावर गाेळीबार केला हाेता. यात सुदैवाने अधिकारी वाचले असले तरी सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा अधाेरेखित झाला हाेता. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी बंदुक साेबत बाळगण्याची परवानगी देण्यात अाली अाहे. 

    याबाबत बाेलताना पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, शहरातील जे रस्ते माेठे अाहेत अाणि त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहने लावणे शक्य अाहे परंतु अनेक वर्षांपासून ताे भाग नाे पार्किंग म्हणून घाेषित करण्यात अाला अाहे, अशा रस्तांचा अभ्यासकरुन ते ठिकाणी अधिकृत पार्किंगसाठी घाेषित करता येईल का याचा विचार अाम्ही करत अाहाेत. येरवडा कारागृहाच्या संदर्भात त्या भागाची पाहणी करुन तेथील पार्किंगमुळे कारागृहाच्या सुरक्षेला धाेका पाेहचणार असेल तर निश्चित तेथे कारवाई करण्यात येईल. 

Web Title: The question of safety of the prison arrives due to unauthorized parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.