हवेली तालुक्यातील 'गुटखा किंग'च्या घरावर छापा; २ लाख ५० हजारांचा माल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 08:32 PM2021-01-29T20:32:51+5:302021-01-29T20:34:00+5:30

हवेली तालुक्यांतील सर्व गुटखा विक्रेत्यांना मालाचा पुरवठा करत आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Raid on Gutkha King's house in Haveli taluka; Goods worth Rs 2 lakh 50 thousand confiscated | हवेली तालुक्यातील 'गुटखा किंग'च्या घरावर छापा; २ लाख ५० हजारांचा माल जप्त 

हवेली तालुक्यातील 'गुटखा किंग'च्या घरावर छापा; २ लाख ५० हजारांचा माल जप्त 

लोणी काळभोर : अन्न व औषध प्रशासन पुणे चे पथकाने येथील गुटखा माफियाच्या घरावर छापा टाकून तब्बल २ लाख ३८ हजार ३४० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन पुणे चे अन्न सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सुरेश मिलापचंद ओसवाल ( जैन ) ( वय ४४, रा. घर क्रमांक ५\६७२, माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई गुरुवारी ( दि.२८ ) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. ओसवाल हा महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा यांचे प्रतिबंधित आदेशानुसार राज्यात गुटखा, पानमसाला यांचे उत्पादन,साठा, वितरण, वाहतूक तसेच विक्री यांवर बंदी घातली असताना देखील त्यांचा साठा करून विक्री करतो अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी प्रद्युम्न विश्वनाथ आघाव, राहुल खंडागळे,  अशोक ईलागेर, यांच्यासमवेत ओसवाल यांच्या पथकाने घरावर अचानक छापा घातला असता त्यांना तेथे गुटखा आढळून आला. पथकाला याठिकाणी एकूण २ लाख ३८ हजार ९४० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला आहे. तो जप्त करून अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. हवेली तालुक्यांतील सर्व गुटखा विक्रेत्यांना मालाचा पुरवठा करत आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरेश ओसवाल ( जैन ) हा या परिसरातील मोठा गुटखा किंग असून यापूर्वी १७ जुलै २०१७ रोजी मध्यरात्री शिंदवणे घाटांत त्याने कर्नाटक राज्यातून स्वीफ्ट कारमधून आणलेला कारसह गुटखा असा एकूण ८ लाख २५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंंतर २८ सप्टेंबर २०१७ रोजी त्याने नायगांव ( ता. हवेली ) येथील मार्गवस्ती येथील एका घरात ठेवलेला ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला होता. तर ३१ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणावरून ५ लाख ३५ हजार २० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. ओसवालवर त्यापुर्वीही अनेक वेळा अशीच कारवाई झाली होती. व मोठ्या प्रमाणांत गुटका व पानमसाला जप्त करण्यांत आला होता. याप्रकरणी तो काही महिने येरवडा तुरुंगात जावून आला आहे. सध्या तो जामिनावर सुटला आहे. यापैकी तीन प्रकरणाचे खटले शिवाजीनगर पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रलंबित आहेत.

Web Title: Raid on Gutkha King's house in Haveli taluka; Goods worth Rs 2 lakh 50 thousand confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.