पुणे : रेल्वेगाड्यांमध्ये जादा दराने खाद्यपदार्थ देऊन प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर आता अंकुश बसणार आहे. गाड्यांमधील अधिकृत विक्रेत्यांना पॉर्इंट आॅफ सेल (पॉस) मशिन दिल्या जाणार असून त्यावरून निश्चित केलेल्या दरानेच खाद्यपदार्थ देता येणार आहे. तसेच, त्यावरून त्याचे बिलही प्रवाशांना लगेच मिळणार आहे. त्यामुळे पारदर्शकतेबरोबरच प्रवाशांची लूटही थांबणार आहे.भारतीय रेल्वेने स्थानके तसेच गाड्यांमधील खानपानाच्या सुविधेचे काम इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडे सोपविले आहे. त्यानुसार ‘आयआरसीटीसी’ने विविध खाद्यपदार्थांचे दर निश्चित करून दिले आहेत. या दराप्रमाणेच प्रवाशांना खानपानाची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे. या मशिनवरून प्रवाशांना खाद्यपदार्थांनुसार बिलही मिळेल. रेल्वेमध्ये विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे जादाचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे.‘आयआरसीटीसी’ने निश्चित केलेले दर खाद्यपदार्थ व दर (रु.)चहा - ७ कॉफी - ७ पाणी बाटली (१ लिटर) -१५जनता खाना -१५शाकाहारी नाश्ता -२५मांसाहारी नाश्ता-३०शाकाहारी जेवण -४५मांसाहारी जेवण -५०रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. या संदर्भात अनेक तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. क्रेत्यांनी प्रवाशांना बिल देणे गरजेचे असूनही विविध कारणे सांगून बिल देण्याचे टाळले जाते, असे अनुभवही प्रवाशांना आले आहेत. प्रवाशांच्या सेवेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता भारतीय रेल्वेने विक्रेत्यांना ‘पॉस’ मशिन देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुरू केली जाईल.रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांकडे पीओएस मशिन, पेटीम किंवा इतर आॅनलाईन सुविधांद्वारे पैसे देण्याची सुविधा आहे. रेल्वेगाड्यांमध्ये विक्रेत्यांकडे पीओएस मशीन देण्याबाबत अद्याप सूचना मिळालेल्या नाहीत.- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे
रेल्वे प्रवाशांची लूट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:45 PM
पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे.
ठळक मुद्देनिश्चित दरानुसार खाद्यपदार्थ मिळणार : खानपानाचे बिल ‘पॉस’वर मिळणार रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री भारतीय रेल्वेने विक्रेत्यांना ‘पॉस’ मशिन देण्याचा निर्णय रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री