रेन हार्वेस्टिंग भागविणार तहान
By Admin | Published: April 17, 2016 02:59 AM2016-04-17T02:59:22+5:302016-04-17T02:59:22+5:30
सध्या राज्यासह शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात सुमारे नऊशे
पिंपरी : सध्या राज्यासह शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात सुमारे नऊशे बांधकामांच्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या या प्रकल्पामुळे दूर झाली आहे.
राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार शहरातील इमारतीसाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प बंधनकारक केला आहे. त्यानुसार महापालिकेने एप्रिल २००५पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. गावठाण क्षेत्र वगळून तीनशे चौरस मीटर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पांसह, बंगला, व्यावसााियक बांधकामे येथे हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे.
सध्या बहुतेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. यासह रस्त्याच्या आजूबाजूला थोडीफार जागा शिल्लक राहते, त्या ठिकाणीही आता पेव्हिंग ब्लॉक बसविले जात आहेत. (प्रतिनिधी)
- सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात तीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरात पंधरा टक्के पाणीकपात केलेली आहे. तर येत्या पंधरा दिवसांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आताच काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशी वेळ येऊ नये, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबवायला हवेत, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले.