पुण्यात पावसाचा हाहा:कार! अनेक ठिकाणी रस्त्यात झाडं कोसळली; वाहतूककोंडीचा मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:27 PM2021-07-23T17:27:45+5:302021-07-23T17:46:33+5:30

पुणेकरांवर जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ; अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली

Rain in Pune haha: car! Trees fell on the road in many places; Annoyance of traffic congestion | पुण्यात पावसाचा हाहा:कार! अनेक ठिकाणी रस्त्यात झाडं कोसळली; वाहतूककोंडीचा मनस्ताप

पुण्यात पावसाचा हाहा:कार! अनेक ठिकाणी रस्त्यात झाडं कोसळली; वाहतूककोंडीचा मनस्ताप

Next
ठळक मुद्देखडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग पावसामुळे वस्ती भागात पाणी शिरण्याच्या घटना नदीपात्र परिसरात अग्निशमन दलाचे जवान तैनात

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी कर्वेनगर भागातील नवसह्याद्री परिसर, विठ्ठल मंदिर तसेच एरंडवणे भागातील पटवर्धन बाग आणि रास्ता पेठ  भागात झाडे कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. शहरात दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे वस्ती भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत.

मात्र, खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्र परिसरात अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. खडड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे जीव मुठीत धरून पुणेकरांना वाहन चालविण्याची वेळ येत आहे.

दरम्यान, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन जिमखाना परिसरातील भिडे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात पोलीस  बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.  डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

झाडे कोसळ्ल्यामुळे रिक्षाचालक जखमी; अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविले प्राण 

रास्ता पेठेतील केईएम रूग्णालयासमोर मोठे झाड कोसळून एका रिक्षाचालकाच्या अंगावर पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवित रिक्षाचालकाची जखमी अवस्थेतून सुटका केली. रिक्षाचालकांचे प्राण वाचले. मियालाल जमादार (वय 80) आणि पादचारी महिला संगीता नेमसे ( वय 34) जखमी झाले. झाड कोसळल्यामुळे 5 दुचाकी, 1 ऑटो रिक्षा आणि एका सायकलीचे नुकसान झाले. 

Web Title: Rain in Pune haha: car! Trees fell on the road in many places; Annoyance of traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.