पुणे : तृतीयपंथीयांना (एलजीबीटीक्यू) समान मानवी हक्क देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तिसरा वर्धापनदिन काँग्रेस भवनमध्ये सोमवारी इंद्रधनुषी रंगाचा झेंडा फडकावण्यात आला.
शहर काँग्रेस आणि प्रोफेशनल्स काँग्रेस महाराष्ट्र यांनी याचे आयोजन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड म्हणाले, या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजातील या घटकाला प्रतिष्ठेने जगणे शक्य झाले आहे. प्रोफेशनल्स काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष मॅथ्यू अँटनी तृतीयपंथीयांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे वेगळा आयोग स्थापन करण्याची मागणी करणार आहेत. सुमेध गायकवाड, जारा परवाल यांची भाषणे झाली. शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर, रवींद्र म्हसकर, महाराष्ट्र काँग्रेसच्या शानी नौशाद, लेखा नायर आदी या वेळी उपस्थित होते. प्रोफेशनल्स काँग्रेस एलजीबीटीक्यू समितीचे श्रीराम यांनी सूत्रसंचालन केले. ''मिस्ट'' संस्थेतर्फे तृतीयपंथीयांना रेशन देण्यात आले.