पुणे : बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़. १८ व १९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या असून ते पुढील २४ तासात पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात पडलेला पाऊस वैभववाडी, विक्रमगड १३०, सुधागड पाली ११०, माथेरान १००, भिवंडी, कल्याण ९०, ठाणे ८०, खालापूर, पनवेल ७, अंबरनाथ, उल्हासनगर ६०, पोलादपूर ५०, कणकवली ४० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, ओझरखेडा ६०, लोणावळा, महाबळेश्वर ५०, शहादा ३० मिमी पावसाची नोंद झाली़ मराठवाड्यातील अर्धापूर, घनसावगी, हिमायतनगर, परभणी, शिरपूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात कोरची ५०, चिखलदरा, देवरी, सेलू ३०, आर्वी, कुरखेडा, मौदा, पारशिवनी २० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावर ताम्हिणी, लोणावळा ६०, डुंगरवाडी, कोयना (नवजा) ५० मिमी पाऊस झाला होता़.
इशारा :
- १८ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
- १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़.
- २० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता़.
- २१ सप्टेंब रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
- १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
- पालघर, रायगड, जिल्ह्यात मुसळधार तर, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्'ात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.
- १९ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
- रायगड, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, अहमदनगर, सातारा, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ .
- २० सप्टेंबरला पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.