Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:58 PM2022-03-09T19:58:58+5:302022-03-09T19:59:56+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने मनसे पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे

Raj Thackeray: Sometimes I feel the need to write a letter to Modi, says Raj Thackeray | Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या सुरुवातीला बोलताना राज ठाकरेंनी कोविड काळातील भयानक आठवणी आणि लॉकडाऊनचा काळ कथित केला. तसेच, कधी कधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे, असे वाटत असल्याचंही ते म्हणाले.  

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने मनसे पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये नव्यानं ऊर्जा भरण्याचं काम आपल्या भाषणातून केलं. आजच्या सोहळ्यात दिवंगत लता मंगेशकर आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी, साधारण 23 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू झाल्याचं ते म्हणाले. त्यानंतर, दोन दिवसांनी मी माझ्या कन्येसह घराबाहेर व्हरांड्यात आलो होतो. त्यावेळी, प्रचंड शांतता, कुठेही माणूस नाही, कसलाही आवाज नाही. तेव्हा फक्त आणि फक्त पक्षांचा किलबिलाट ऐकू येतोय. म्हणूनच, कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहून सांगावं, महिन्यात दोन दिवस लॉकडाऊन लावाच, अशी मन की बात राज यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. 

लॉकडाऊनमध्ये कोकिळाही कुहू कुहूऐवजी कोविड कोविड... असं ओरडायला लागल्या होत्या. त्या वातावरणात भीती होती, पण कुटुंब जवळ आली. सर्वजण एकमेकांसोबत जेवायला लागली, एकमेकांची काळजी करायला लागली, असे म्हटले. संकटे येत असतात, संकटे येताना हातात हात घालून येत असतात. आमच्यावर अजूनही संकटे आहेत, आमच्या पक्षावर अजूनही संकट आहेत. पण, अशा संकटांना घाबरायचं नसतं, संकटांची एक वेगळीच मजा असते, असे म्हणत कोविडच्या आठवणी जागवत राज यांनी आता नव्या जोमाने संकटांवर मात करुन पुढे जाण्याचा सल्ला सर्वांनाच दिला. 

Read in English

Web Title: Raj Thackeray: Sometimes I feel the need to write a letter to Modi, says Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.