जिजाऊंच्या जयघोषाने राजगड दुमदुमला

By admin | Published: January 14, 2017 03:32 AM2017-01-14T03:32:32+5:302017-01-14T03:32:32+5:30

राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४१९ व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी

Rajagad Dumdum from Jijau | जिजाऊंच्या जयघोषाने राजगड दुमदुमला

जिजाऊंच्या जयघोषाने राजगड दुमदुमला

Next

धायरी : राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४१९ व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड व परिसर ‘जय जिजाऊ जय शिवराय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
सरसेनापती हरजीराजे महाडिक यांचे वंंशज विजयसिंहराजे महाडिक, सरसेनापती धनाजी जाधव यांचे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, नरवीर तानाजी मालसुरे यांचे वंशज शीलाताई मालसुरे, सरदार येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, शूरवीर झुंझारराव यांचे वंशज प्रतापराव मरळ, तसेच बांधकाम विभागाचे अभियंता आर. एल. ढाणगे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, पोलीस अधिकारी बी. डी. वळकुंडे यांच्या हस्ते जिजाऊ व शिवराय यांची शासकीय पूजा करण्यात आली. राजगडावरील शिवरायांच्या राजसदरेत सकाळी हनुमंत दिघे, किरण जेधे, शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मावळा जवान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस, तानाजी मरगळे, नानासाहेब धुमाळ यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ गौरव राष्ट्रीय पुरस्काराने सुलोचनाराजे महाडिक व वेल्हे येथील शोभा जाधव यांचा गौरव करण्यात आला. कन्नर (कर्नाटक) येथील ज्येष्ठ शिवभक्त संभाजीराव चेंडके यांचा मावळाभूषण पुरस्काराने, तर सुनील पासलकर यांचा वारकरीभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्काराने विश्वनाथ जगताप, संगिता ताठे, प्रियंगा साळी, मच्छिंद्र हिलाळ, गोरक्ष सोनवणे, सोमनाथ जगताप, यांना तर मावळा रत्न गौरव पुरस्काराने संतोष चाकणकर, विक्रम दारवटकर यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Rajagad Dumdum from Jijau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.