शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:18 AM

राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ होते असे मत प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे : राजर्षी शाहूमहाराज आणि प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे सामाजिक दीपस्तंभ होते असे मत प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले. मानवी हक्क संस्थेचे प्राचार्य डॉ. राम दशरथ आबणे यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहूमहाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक विचार, संत रविदास यांचे कार्य व विचार, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद चरित्र या तीन पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी दौंडचे विद्यमान आमदार अ‍ॅड. राहुल कुल, लक्ष्मीकृपा सह. बॅँकेचे संचालक रविंद्रनाथ आबनावे, जि.प. पुणे माजी अध्यक्ष वैशाली आबणे, माजी शिक्षणाधिकारी पंढरीनाथ अढागळे, मानवी हक्क संस्थेचे राष्टÑीय सचिव राजेश गवळी यांचे हस्ते प्रकाशन पार पडले. जोशी म्हणाले, डॉ. राम आबणे यांच्या या पी.एच.डीवर आधारित ग्रंथामुळे समाजप्रबोधनाची वाट सुकर झाली आहे. एकविसाव्या शतकाचे प्रबोधन या सर्व ग्रंथामुळे अधिक उन्नत होईल. त्यांनी डॉ. आबणे यांच्या पीएचडीच्या हॅट्रिकचेही खास कौतुक केले. आमदार कुल यांनीही छोट्या भाषणात डॉ. आबणे यांच्या लेखनकार्याला धन्यवाद देऊन हे ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना मार्गदर्शक ठरावे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राम आबणे यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप दळवी यांनी मानले.

टॅग्स :Puneपुणे