लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरी : कोरोना संसर्गजन्य आजाराचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन राजुरी (ता.जुन्नर) येथील गावात अत्यावश्यक सेवा वगळून शुक्रवार पासुन तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला असल्याचे सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले.
राजुरी गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारी (दि १४) ८ कोरना रुग्णांचे निदान झाले. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या वेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, मंडल अधिकारी नितीन चौरे, माजी सभापती दिपक औटी, सरपंच प्रियाताई हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, बाळासाहेब हाडवळे, सुदाम औटी, जी. के. औटी, वल्लभ शेळके यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राजुरी गाव शुक्रवार पासुन तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंद काळात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.