अनाथ मुलांबरोबर साजरे केले रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:53+5:302021-08-23T04:13:53+5:30

आई इंदूबाई व वडील लक्ष्मण पायगुडे यांच्या स्मृती व शिकवणीतून या तीन भगिनी दर वर्षी राखी बांधतात. आईवडील नसल्याचे ...

Rakshabandhan celebrated with orphans | अनाथ मुलांबरोबर साजरे केले रक्षाबंधन

अनाथ मुलांबरोबर साजरे केले रक्षाबंधन

Next

आई इंदूबाई व वडील लक्ष्मण पायगुडे यांच्या स्मृती व शिकवणीतून या तीन भगिनी दर वर्षी राखी बांधतात. आईवडील नसल्याचे दुःख काय आहे हे आम्ही जवळून अनुभवले आहे. शुभांगी पायगुडे या भैरवनाथ विद्यालयात लिपिक म्हणून काम करीत असून अर्चना पायगुडे या शिक्षक आहेत. तर तिसरी बहीण पुणे येथे संगणक अभियांत्रिकीची नोकरी करीत आहे. गलांडवाडी येथे अनाथ विद्यार्थ्यांचे संगोपन खंडेराव खाडे व प्रमिला खाडे हे कुटुंबीय गेल्या २१ वर्षांपासून शासकीय अनुदानाविरहित करीत आहे. हे विद्यार्थी दर वर्षी रक्षाबंधनला आमची वाट बघत असतात. आम्हीही त्यांच्याशी सख्ख्या बहिणी इतका आधार देतो. आम्हाला भाऊ नाही, असे कधीही वाटत नाही. त्यांनी याच बालकांना आमचे भाऊ मानले आहे. हे बालक आम्हाला देखील अगदी बहिणीला ज्या हक्काने अडचणी सांगतात त्या हक्काने ते आम्हाला सुद्धा त्यांच्या अडचणी सांगतात. अडचणी सोडल्यावर किंवा त्यांच्या मदतीला आल्यावर एक वेगळाच आनंद होतो. आम्ही यापुढेही दर वर्षी या बालकांना राख्या बांधू, असे शुभांगी पायगुडे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव बापू बडे,सचिन बोरकर व संस्थेतील सर्व अनाथ बालक उपस्थित होते.

२२ केडगाव राखी

220821\1533-img-20210822-wa0026.jpg

गलांडवाडी येथे खाडे आश्रमातील अनाथ मुलांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा करताना तीन भगिनी

Web Title: Rakshabandhan celebrated with orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.