कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 08:47 PM2018-07-04T20:47:30+5:302018-07-04T20:50:47+5:30

सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती. 

ran away women accused in the Kamshet police custody was arrested | कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद

कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद

Next
ठळक मुद्दे महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

जेजुरी : कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असणारी महिला आरोपी पहाटे सहा वाजता वॉशरुमच्या बहाण्याने पळून गेली. या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजू आडकर (रा. इंदायणी कॉलनी कामशेत,ता.मावळ जि.पुणे ) ही महिला कामशेत येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तेथील डॉक्टर एका पतसंस्थेत पैसे भरण्यासाठी या महिलेकडे देत होते. या महिलेने सुमारे २ लाख ९४ हजार रुपये पतसंस्थेत भरले नसल्याने या महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवार (दि. ४ जुलै)पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती. 
  जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना सदर महिलेचे फोटो व माहिती मिळाली होती. सदर महिला जेजुरी बस स्थानक परिसरात दिसून आल्याची खबर पोलिसांना मिळाली. माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फोटो व माहिती देवून या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील, फौजदार चंद्रकांत सातभाई,पोलीस हवालदार शिवा खोकले,महेश उगले, अतुल मोरे,संतोष मेढेकर, महिला पोलीस कर्मचारी कल्पना वाबळे,योगिता जाधव यांनी सदर महिलेस जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले. 
जेजुरी : कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असणारी महिला आरोपी पहाटे सहा वाजता वॉशरुमच्या बहाण्याने पळून गेली. या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजू आडकर (रा. इंदायणी कॉलनी कामशेत,ता.मावळ जि.पुणे ) ही महिला कामशेत येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तेथील डॉक्टर एका पतसंस्थेत पैसे भरण्यासाठी या महिलेकडे देत होते. या महिलेने सुमारे २ लाख ९४ हजार रुपये पतसंस्थेत भरले नसल्याने या महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवार (दि. ४ जुलै)पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती. 
  जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना सदर महिलेचे फोटो व माहिती मिळाली होती. सदर महिला जेजुरी बस स्थानक परिसरात दिसून आल्याची खबर पोलिसांना मिळाली. अंकुश माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फोटो व माहिती देवून या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील, फौजदार चंद्रकांत सातभाई,पोलीस हवालदार शिवा खोकले,महेश उगले, अतुल मोरे,संतोष मेढेकर, महिला पोलीस कर्मचारी कल्पना वाबळे,योगिता जाधव यांनी सदर महिलेस जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले. 

Web Title: ran away women accused in the Kamshet police custody was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.