गॅस वितरकाला मागितली खंडणी; एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:00+5:302021-09-02T04:26:00+5:30
पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहन बोऱ्हाडे याने शहा यांच्याविरुद्ध तहसील कार्यालय जुन्नर येथील पुरवठा विभागांमध्ये माहिती ...
पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहन बोऱ्हाडे याने शहा यांच्याविरुद्ध तहसील कार्यालय जुन्नर येथील पुरवठा विभागांमध्ये माहिती अधिकाराद्वारे शहा यांचे नागरी वस्तीमध्ये गॅस गोडाऊन कसे काय? याबाबत माहिती मागितली होती बोऱ्हाडे याने त्यांचे दोन अनोळखी साथीदारांना शहा यांचे ऑफिसमध्ये पाठवून पैशांची मागणी केली व फोन करून माझी माणसे पाठवले आहेत. त्यांच्याकडे पैसे दे. तसेच वेळोवेळी माझे संस्थेमध्ये येणारा खर्च तुला द्यावा लागेल, नाहीतर मी तुझ्याविरुद्ध फेसबुक लाईव्ह करून, तुझा व्यवसाय कसा चालतो ते बघून घेईल अशी धमकी दिली होती.
चौकट :
दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी आणि जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्याविषयी तसेच स्थानिक नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी यापूर्वीही बोऱ्हाडे याच्याविरुद्ध तक्रारी आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश कर्डिले, उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी आदींनी अक्षय बोराडे याच्या विरोधात जुन्नर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला आहे.