बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करून मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:47+5:302021-02-05T05:00:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करून त्याला सोडून देण्यासाठी ...

Ransom demanded by kidnapping builder's office boy | बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करून मागितली खंडणी

बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करून मागितली खंडणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करून त्याला सोडून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी वारेज पोलिसांनी गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या मुलाने गुन्हेगारांचे भांडण सुरु असताना रात्री स्वत:ची सुटका करून घेतली आहे. त्याला येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते.

याप्रकरणी साईकमार शिवमूर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथील कार्यालय आहे. १८ वर्षाचा धीरज ऑफिस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथे आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने धीरज याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व येरवडा येथे जायचे असल्याचे सांगून त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी जावळकोटी यांना वेगवेगळ्या चार मोबाईलवरुन फोन करुन धीरजला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. जावळकोटी यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. पोलिसांनी धीरज याचा शोध सुरू केला. तेव्हा त्याला रिक्षातून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. धीरज याचा शोध सुरू असतानाच त्याने स्वत: या मुलांच्या तावडीतून सुटका करून घेतली.

या तिघा अपहरण करणाऱ्यांनी त्याला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेथूनच त्यांनी जावळकोटी यांना फोन करून खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलाचाली सुरू असताना अचानक तिघे भांडू लागले. ही संधी साधून धीरज याने त्यांना धक्का देऊन त्यांना काही समजायच्या आत तेथून पळून आला. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Ransom demanded by kidnapping builder's office boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.