पुणे : बहिणीला उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला. सूरज भालचंद्र यशवदे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१३ ते मे २०१५ या कालवधीत घडली. सूरज आणि पीडित मुलगी राजेंद्रनगर भागातील एकाच सोसायटीमध्ये राहत होते. त्यावेळी बहिणीला उचलून नेईन, अशी धमकी देत यशवदे याने त्या मुलीवर बलात्कार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्मही दिला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी यशवदे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. यशवदे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. तो पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. त्याने बलात्कार केल्याचे वैद्यकीय पुराव्यावरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. जन्मलेले बाळ त्याचेच आहे का, हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा अद्याप अहवाल आलेला नाही. त्यामुळे त्याचा जामिन फेटाळावा, असा युक्तीवाद अॅड. बोंबटकर यांनी केला.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सराईताचा जामिन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:53 PM
बहिणीला उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.
ठळक मुद्देही घटना २०१३ ते मे २०१५ या कालवधीत घडली.यशवदे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयीन कोठडीत आहे.