चाकण : लग्नाचे आमिष दाखवून १० वर्षांपासून बंगाली युवतीसोबत एकाच खोलीत एकत्र राहून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल सिद्दप्पा परीट (वय ३२, रा. महाळुंगे इंगळे, मूळ निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००६मध्ये अमोल परीट व फिर्यादी महिलेची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सन २००७मध्ये आरोपीने पीडित युवतीला ‘आपण दोघे लग्न करून चाकण येथे कंपनीत काम करून एकत्र राहू,’ असे म्हणून लग्न करण्याचे आमिष त्याने दाखविले. तसेच, ते महाळुंगे येथे खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले. या कालावधीत आरोपीने पीडित युवतीशी शरीरसंबंध ठेवले तसेच ‘लग्न करतो’ असे सांगून तिची फसवणूक केली. दहा वर्षे एकत्र राहूनही पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारल्यावर आरोपीने पीडितेला वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. चार डिसेंबर २०१७ रोजी पीडित युवतीला आरोपी सोडून त्याच्या मूळ गावी निघून गेला. पीडितेने त्याला वेळोवेळी फोन केला असता त्यांचा फोन बंद होता.यामुळे कंटाळून गुरुवारी तिने चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली.या प्रकरणी अमोल परीटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमारयादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप पुढील तपास करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:32 AM