पुणे : वारजे येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणा-या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या स्कूल बसच्या चालकाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा निकाल दिला.या घटनेची माहिती समजता पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केले होते. तसेच स्कूलबसने प्रवास करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. संदिप शिवाजी कुंभार (वय ३०, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याबाबत सहा वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. १० ते १३ नोव्हेंबर २०१४ दरम्यान पीडित मुलगी जात असलेल्या शाळेच्या परीसरात आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. अॅड. मोरे यांनी याप्रकरणी एकूण ८ साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. अॅड. स्मिता देशमुख यांनी खटल्यात सहकार्य केले. फिर्यादी यांना दोन मुली आहेत. त्यांची सहा वर्षांची मोठी मुलगी वारजे येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. कुंभार चालक असलेल्या स्कूलबसमधून ती शाळेत जात. कुंभार इतर मुलांना- मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत होता. त्याबाबत तिच्या आईने तिला विचारल्यानंतर मुलीने आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल सांगितले. त्यानुसार कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची मानताना दहा वर्ष सक्तमजुरी सुनावली. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल नाईक यांनी केला. शहरात खळबळ माजविणारी घटना अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत कडक नियमावली घालून देण्यात आली होती.
बालिकेवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:21 PM
अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.
ठळक मुद्देबसमध्येच करत होता कुकर्म : पहिलीतील मुलगी, शहरात व्यक्त झाला होता संतापपीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची