राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत रतीलाल बाबेल प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:48+5:302021-03-15T04:10:48+5:30
बाबेल हे धोलवड गावचे रहिवासी व नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर येथे ज्येष्ठ विज्ञान ...
बाबेल हे धोलवड गावचे रहिवासी व नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर येथे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत . वक्तृत्व स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व शिकवण असा होता. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रुपये ३००१, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आहे.
बाबेल यांना प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती माया कटारिया, बाबेल ट्रस्ट,धोलवडचे अध्यक्ष जे.सी.कटारिया, उपाध्यक्ष जयप्रकाश बाबेल, खजिनदार अशोक बाबेल, सदस्य सविता बाबेल, अक्षदा बाबेल, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे सचिव तानाजी वामन आणि सर्व सदस्य शिक्षक यांनी बाबेल यांचे अभिनंदन केले आहे.
रतीलाल बाबेल यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक वक्तृत्व, निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन राज्य स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत.
.
१४ नारायणगाव बाबेल