मेट्रोची सुनावणी पुन्हा लांबणीवर
By admin | Published: August 13, 2016 05:28 AM2016-08-13T05:28:04+5:302016-08-13T05:28:04+5:30
नदीपात्रातून मार्ग जात असल्याच्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
पुणे : नदीपात्रातून मार्ग जात असल्याच्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
पुणे मेट्रोच्या मार्गापैकी काही भाग नदीपात्रातून जात असल्याबद्दल एनजीडीकडे दाद मागण्यात आली आहे. राज्यसभेच्या खासदार अनु आगा यांच्यासह काही पर्यावरणप्रेमींचा त्यात समावेश आहे. नदीपात्राला अडथळा निर्माण होईल, तसेच त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवारी त्याची सुनावणी झाली. त्यामध्ये, महापालिकेने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यावर चर्चा करण्यापेक्षा याचिकेतील मागण्यांवर चर्चा होणे अधिक योग्य ठरेल, असे मत व्यक्त करून
एनजीटीने ही सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.
खंडुजीबाबा चौकापासून ते महापालिकेच्या मुख्य इमारतीपर्यंतचा सुमारे १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून दाखवण्यात आला आहे. या मागार्मुळे नदीच्या प्रवाहाला धोका निर्माण होण्याची भीती याचिकाकर्त्यांनी केली आहे, तसेच पुराचा धोकाही वाढण्याचा दावा त्यांनी केला आहे.