पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीला मुहूर्त,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:30 PM2018-03-06T13:30:06+5:302018-03-06T13:30:06+5:30
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी ६ कोटी ३0 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी ६ कोटी ३0 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
पुणे शहर व परिसरात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १२ ते १३ वसाहती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या वसाहतींची दुरवस्था झाली होती. त्यामुळे वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी देऊनही प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यातच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या आर्थिक नियोजनाच्या बैठकीत पोलिसांच्या वसाहतींच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अजूनही शासनाकडून वसाहतींच्या डागडुजीसाठी निधी प्राप्त झालेला नाही. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत: पुढाकार घेऊन या वसाहतींच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविस्कर म्हणाले, सध्या पोलीस वसाहतींची कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.
पावसाळ्यापूर्वी सर्व वसाहतींची दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी ६ कोटी ३0 लाखांचा निधी खर्च केला जाईल. शासनाकडून हा निधी येणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात इमारतीला होणारी गळती, जलवाहिनी, गटारे आदी कामे प्राधान्याने केली जात आहेत. चार इमारतींच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.कामे पूर्ण झाली आहेत.चार इमारतींच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.कामे पूर्ण झाली आहेत.