पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकीय एकनाथ खडसे यांच्याभोवतीच राज्याचे राजकारण फिरत होते. अखेर त्यांनी शुक्रवारी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर खडसे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगले होते. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना “चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात का? असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच ‘माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन,’ असा गर्भित इशारा देखील भाजपला दिला होता. मात्र 'त्या' टीकेसह खडसे यांच्या इशाऱ्यावर चंद्रकांत पाटील यांना एकाच वाक्यात ' हे ' उत्तर देत जास्त भाष्य करणे टाळले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘अटल’ या बससेवेला शनिवारी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. तसेच पीएमपी केअर अॅपचेही लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्ववती शेंडगे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पालिका आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे संचालक शंकर पवार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तोट्यातच चालवायच्या असतात. कल्याणकारी राज्य म्हणजे कार्पोरेट कंपनी नव्हे. तिने बस, पाण्यातून फायदा कमवावा, ही कल्पना नाही. अशा सुविधा स्वस्त देऊन तोटा सहन करायचा असतो, ‘नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांमध्ये वाहतुक महत्वाची असते. पुण्यात आता सायकलचा विषयच संपला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने वाढत असून वाहतुक कोंडी होत आहे. ही कोंडी संपवायची असेल तर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. ही सेवा स्वस्त असेल तर नागरिक प्राधान्य देतात. त्यामुळे पाच रुपयात प्रवासाची योजना चांगली असून अन्य पालिकाही त्याचे अनुकरण करतील.’
‘शहराच्या मध्यवर्ती भागात नऊ मार्गांवर पाच किलोमीटरच्या अंतरावर प्रत्येक पाच मिनिटाला बस सोडण्यात येणार आहे. या सेवेचे तिकीट फक्त पाच रुपये असेल. एकुण ९९ बसद्वारे ही सेवा पुरविली जाईल. तर अन्य भागात ५३ मार्गांवर १४२ बस धावणार आहेत. अशा विविध योजनांद्वारे प्रवासी संख्या १५ लाखांच्या पुढे तर दैनंदिन उत्पन्न अडीच कोटींच्या पुढे नेण्याचे उद्दीष्ट आहे,’ असे जगताप यांनी सांगितले.-----------------------------अटल योजनेतील मार्ग१. न. ता. वाडी ते पुणे स्टेशन (अभियांत्रिकी महाविद्यालय वसतिगृह, शिवाजी पुतळा, कुंभारवाडा, ससूनमार्गे)२. स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव रस्ता, शिवाजी पुतळा, लोकमंगलमार्गे)३. स्वारगेट ते पुणे स्टेशन (खजिना विहीर, केसरीवाडा, अ. ब. चौक, फडके हौद, ससूनमार्गे)४. स्वारगेट ते शिवाजीनगर (डेक्कनमार्गे)५. स्वारगेट ते पुणे स्टेशन (सेव्हन लव्हज् चौक, रामोशी गेट, केईएम रुग्णालय, ससूनमार्गे)६. स्वारगेट ते पुणे स्टेशन (सेव्हन लव्हज् चौक, रामोशी गेट, अल्पना टॉकीज, गणेश पेठ, फडके हौद, ससूनमार्गे)७. डेक्कन ते पुलगेट (कुमठेकर रस्ता, मंडई, गाडीखाना, गंज पेठ, भवानी पेठ, जुना मोटार स्टॅन्डमार्गे८. डेक्कन ते पुणे स्टेशन (केळकर रस्ता, अ. ब. चौक, फडके हौद, ससूनमार्गे)९. डेक्कन ते पुणे स्टेशन (कुमठेकर रस्ता, अ. ब. चौक, फडके हौद, क्वार्टर गेट, लाल देऊळ, ससूनमार्गे)------------