देशाप्रती जबाबदारी पार पाडावी: लोहकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:16+5:302020-12-08T04:10:16+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोहकरे,मारुती तळपे,बिरसा मुंडा क्रांती समितीचे अध्यक्ष नितीन लोहकरे,वैभव लोहकरे,ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या मनिषा कानडे,सानेगुरुजी कथा मालेचे सचिव चांगदेव पडवळ,आदर्श शिक्षक विकास कानडे,संतोष कानडे,विशेष शिक्षिका स्वाती पडवळ,मुख्याध्यापक संतोष थोरात, प्राध्यापिका कमल थोरात,सुरेखा कानडे यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बाळासाहेब कानडे म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी न्याय, समता व बंधुता या त्रिसूत्रीवर संविधानाची निर्मिती करून भारतीय लोकांना समान हक्क व कर्तव्ये प्रदान केली.लोकांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या विचारानुसार आचरण करावे,त्यांनी निर्मिलेल्या राज्यघटनेमुळे,घालून दिलेले विचार व संस्कारामुळे आज संपूर्ण भारत देश एका धाग्यामध्ये बांधला गेला आहे. आपल्या न्याय व हक्कासाठी संविधानानुसार वाटचाल करून आपल्या गावाची प्रगती करावी.
फोटो
०७ तळेघर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर