शहरात ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
By admin | Published: August 31, 2016 01:02 AM2016-08-31T01:02:58+5:302016-08-31T01:02:58+5:30
कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार २७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मकतेचे आदेश
पिंपरी : कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार २७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मकतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सण, उत्सवाचा कालावधी, त्यातच मोर्चे, आंदोलने यातून कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, याची खबरदारी म्हणून पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन, घोषणाबाजी, हत्यार बाळगणे या कृत्यांना मज्जाव घालण्यात आला आहे.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१च्या कलम ३७(१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांनी अहवालाद्वारे कळविल्यानुसार शहरात विविध कारणास्तव कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विविध प्रश्नांवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची होणारी आंदोलने, तसेच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे अचानक उद्भवणारी तणावाची स्थिती, ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने दहा दिवसांचा गणेशोत्सवाचा कालावधी सुरू होत आहे. हे लक्षात घेता, प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. २७ आॅगस्टला प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)