कात्रज : एकीकडे एखाद्या गरीब व्यक्तीने आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी एकत्र करून डोंगरमाथ्यावर घेतलेल्या एक - अर्धा गुंठ्यावरील बांधकामांना तातडीने नोटीस जाते, त्याचे बांधकाम पाडले जाते. मात्र ऐतिहासिक वारसा असलेल्या दक्षिण पुण्याची डोंगराची कमान गोडाऊन व हॉटेलचालकाने अक्षरश: पोखरून काढली तरी याकडे तहसील कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
या भागातील सर्व डोंगरफोडीचे पुन्हा पंचनामे तेही जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या उपस्थितीत करून घेणे अपेक्षित आहे. कारण येथील सर्व पंचनामेच संशयाच्या भोवºयात अडकले आहेत. तसेच विनापरवाना डोंगरफोड करणाºयांवर गुन्हे दाखल झाले तरच या भागातील डोंगरफोड थांबेल अन्यथा पुढच्या पिढीला या भागात कधी कात्रजचे डोंगर होते हेच माहीत होणार नाही.
या डोंगरफोडीमुळे याच डोंगराच्यावर राहणारे नागरिकदेखील जीव मुठीत घेऊन आहेत. कारण खालून डोंगर पोखरले गेल्यामुळे कुठल्याही क्षणी विपरीत घटना या भागात घडू शकते.तसेच रत्याच्या दुसºया बाजूला असलेल्या गुजरवाडी, मांगडेवाडी, कात्रजचा काही भाग या ठिकाणीही मोठा पाऊस आला तर माळीणची किंवा शिंदेवाडीची पुनरावृत्ती होऊ शकते.या भागातील सर्व्हे नंबरची पाहणी करून येथील डोंगर फोडलेले सर्व खरेदी खताचे व्यवहार थांबवले पाहिजेत. कारण डोंगर फोडून प्लॉटिंगचे व्यवहार या पुणे-सातारा महामार्गावर होत आहेत. काही दिवसांपूर्वी कात्रज टेकडीवर कारवाई झाली. अनेकांची घरे पाडण्यात आली.मात्र या अधिकाºयांना या राष्ट्रीय महामार्गावर चाललेली डोंगराची कत्तल दिसली नाही. पुणे शहर मेट्रो शहर होत आहे. मात्र पुण्याचे खरे सौंदर्य व पुण्याचा इतिहास सामावून घेणाºया या टेकड्याच आहेत. याच्यावरच घाला घातला जात असेल तर हा पुणेकरांचा अधिकाºयांकडून होणारा विश्वासघात आहे.
फक्त वरिष्ठ अधिकाºयांना दाखवण्यापुरती कारवाई करायची, असा प्रकार या भागात सुरू आहे. येथे कारवाई करणाºया अधिकाºयाला व डोंगर पोखरणाºया व्यक्तीला वाटेल तेवढा दंड आकारायचा व काही दिवस काम थांबवायचे. त्यानंतर पुन्हा डोंगरफोड सुरूच. जर नियमानुसार दंडवसुली झाली तर कोट्यवधीचा महसूल होईल गोळा.