दौंड येथे वाळू माफियांना महसूलचा दणका; वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनने केल्या उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 08:10 PM2021-02-12T20:10:18+5:302021-02-12T20:15:26+5:30

खेड, वाटलुज येथे कारवाई 

Revenue hit to sand criminal at Daud; Sand dredging boats destroyed by gelatin | दौंड येथे वाळू माफियांना महसूलचा दणका; वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनने केल्या उद्धवस्त

दौंड येथे वाळू माफियांना महसूलचा दणका; वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनने केल्या उद्धवस्त

googlenewsNext

राजेगाव : दौंड तालुक्यात फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसुल विभागाने कारवाई करत वाळू माफियांना दणका दिला आहे. खेड (ता. कर्जत) येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज येथे (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट अशा १४ बोटी जिलेटीनच्या साह्याने उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईत वाळूमाफियांचे मोठे नुकसान झाले आहे. 

दौड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दिवसांपासून नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. या बाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.यामुळे दाैंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी गुरूवारी (दि ११) येथील नदीपात्रात तलाठी, मंडल अधिकारी यांना घेऊन वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर मोठी कारवाई केली. यात १४ बोटींना जलसमाधी देण्यात आली. 

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. भीमा नदीतील या काळ्या सोन्याचे तरुणांमध्ये दिवसेंदिवस आकर्षण वाढत आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने अनेक तरुण या अवैध धंद्याकडे वळत आहे. त्यातून गुंडगिरी, दमदाटी आणि मारामारी असे प्रकार करायलाही तरुण मागेपुढे पहात नाहीत.

या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यवाही मध्ये तहसीलदार संजय पाटील, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, तलाठी शशिकांत सोनवणे, दिपक पांढरपट्टे, दिपक आजबे, संतोष इडुळे, हरिश्चंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंग यानी सहभाग घेतला होता.

या वाळू तस्कररांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी.  असे केले तरच वाळू चोरीला मोठा आळा बसेल असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Web Title: Revenue hit to sand criminal at Daud; Sand dredging boats destroyed by gelatin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.