पुणे : उन्हाचा कडाका वाढल्याने रसाळ फळांची कलिंगड, संत्री आणि लिंबाच्या मागणीत वाढ झाली. मागणी वाढल्याने दरात देखील वाढ झाली आहे. तर खरबूज आणि पेरूच्या दरात मात्र घट झाली. पपई, चिक्कू, अननस, स्ट्रॉबेरी, डाळींब आणि मोसंबीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे, तर आवक जास्त झाल्याने खरबुजाच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी घट झाली आहे. संत्र्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली. तर गोणीामागे १०० रुपयांनी लिंबू महागले आहे. पेरुच्या दरातही के्रटमागे १५० ते २०० रुपयांनी घट झाली आहे.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी २० ते २५ टन, संत्री ४० ते ४५ टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबू दीड ते दोन हजार गोणी, पेरू २५० ते ३०० के्रट, चिक्कू दोन हजार गोणी, खरबुजाची ३० ते ४० टेम्पो, स्ट्रॉबेरी ६ ते ८ टन, द्राक्षे ३० ते ३५ टन इतकी आवक झाली.
--
फुलांची मागणी घटली
मार्केट यार्डातील फुलबाजारात आवक जेमतेम होत असून,
लॉकडाऊनच्या तसेच मंदिर बंद होण्याच्या शक्यतेने मागणी कमी आहे. परिणामी दर स्थिरच आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-६०, गुलछडी : ८०-१००, ऑस्टर : जुडी ८-१२, सुट्टा ६०-८०, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-२५, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०, जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : १००- १२०, शेवंती काडी ६०-१२०, लिलियम (१० काड्या) ६००-१०००, ऑर्चिड २००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) ४०-८०.