वांद्रे गावचा रस्ता बंद

By admin | Published: September 26, 2015 02:36 AM2015-09-26T02:36:49+5:302015-09-26T02:36:49+5:30

इनरकॉन कंपनीने ५ वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कर न भरल्यामुळे वांद्रे ग्रामस्थांनी कंपनीचा रस्ता बंद केला आहे. यावर त्वरित तोडगा न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

The road to Bandra village is closed | वांद्रे गावचा रस्ता बंद

वांद्रे गावचा रस्ता बंद

Next

पाईट : इनरकॉन कंपनीने ५ वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कर न भरल्यामुळे वांद्रे ग्रामस्थांनी कंपनीचा रस्ता बंद केला आहे. यावर त्वरित तोडगा न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वांद्रे व तोरणे संयुक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये इनरकॉन कंपनीने सुमारे २४ पवनचक्क्या उभारल्या असून, या पवनचक्क्या उभारल्यापासून आजतागायत कोणताही कर ग्रामपंचातीमध्ये भरला नसल्याने कंपनीकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामपंचायतीला विकासकामे करताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून सर्वसामान्य नागरिकांची थोडी जरी थकबाकी असल्यास ग्रामपंचायत वसुलीसाठी कायदेशीर बाबींची अंमलबजावणी करते; परंतु कंपनीकडे फार मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना कंपनी कर जमा करण्याबाबत कुचराई करीत असल्याने कंपनीला समज देण्यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंपनीचा रस्ता बंद केला असल्याचे उपसरपंच संजय जाधव यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच जाधव यांनी कंपनीला येणे बाकी आहे. (वार्ताहर)

Web Title: The road to Bandra village is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.