बावडा : बावडानजीक एक किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपातील विक्रीची रक्कम दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना पेट्रोल पंप मालक डॉ. श्रेनिक नेमचंद दोशी (वय५०) यांना अज्ञात दरोडेखोरांनी गाडी आडवून चाकूने हल्ला केला. व त्यांच्या जवळीक १ लाख ७४ हजारांचीे रोख रक्कम पळवून हल्लेखोरांनी पोबारा केला. या संदर्भात इंदापूरपोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात डॉ.दोशी यांच्या हातावर व मांडीवर चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाल्याने पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. प्रवीण दोशी यांनी दिली. या दुर्घटनेची हकीकत अशी की डॉ. श्रेणीक हे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेट्रोल पंपावरील जमा झालेली विक्रीचीे रक्कम घरी घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी गावानजीक असलेल्या स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या गट कार्यालयाजवळ काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांची गाडी आडवी करून डॉ. दोशी यांच्यावर हल्ला केला. पैशाची बॅग चोरटे ओढीत असताना त्यास डॉ. दोशी यांनी प्रतिकार केला असता त्यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी अकलूजच्या दिशेने पलायन केले.या घटनेचा अधिक तपास इंदापूरपोलिस करीत आहेत.
पेट्रोलपंप चालकावर दरोडोखोरांचा चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 9:08 PM
अज्ञात दरोडेखोरांनी गाडी आडवून पेट्रोलपंप चालकावर केला चाकूने हल्ला
ठळक मुद्दे१ लाख ७४ हजाराची रक्कम पळविली या संदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला