पुणे : घरानंतर लहान मुले सर्वाधिक काळ शाळेत आपल्यासमोर असतात. समाजातील बºया वाईट गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मुलांचे समुपदेन करण्यासाठी शाळांना पुणेपोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंगकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी सांगितले. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित विद्यार्थी सुरक्षितते संदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पोलीस आयुक्तालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ.व्यंकटेशम बोलत होते. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी औंध व बिबवेवाडी परिसरातील सर्व खासगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापकांना प्रामुख्याने सायबर क्राईम व सोशल मीडियाचा गैरवापर करुन गुन्हे कसे होतात, वाहतूक नियमन, अंमली पदार्थांचे मुलांमधील वाढत असलेले व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, विशेष बाल सुरक्षा प्रतिबंधक पथकाच्या शिल्पा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला महापालिकेचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, शशिकला रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रात २५० मुख्याध्यापक उपस्थित होते़ यावेळी काही मुख्याध्यापकांनीही आपले अनुभव व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही़ मुले बिघडल्यास पालक जबाबादार आहे.याकरीता मुलांपेक्षा त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे ज्योती भिलारे यांनी सांगितले. पुढील दोन दिवस शहरातील अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापिकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.़़़़़योग्य संस्कार, मार्गदर्शनाने मुले नक्कीच सुधारतातमुलांना योग्य संस्कार आणि वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यास मुले नक्कीच कतृत्ववान बनू शकतात, असा स्वत:चा अनुभव दिग्वीजय प्राथमिक इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका जयश्री घाटगे यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, धनकवडी येथील एक मुलगा तेथील मंडळात होता. तलवारीने मारामारीपर्यंत त्याची मजल गेली होती. त्याच्या आईवडिलांनी ६ वीत असताना त्याला आमच्या शाळेत आणले, तो हाताबाहेर गेला असल्याचे आईने सांगितले. त्या मुलाला विश्वासात घेऊन मार्गदर्शन केले. त्याने हळुहॅळु सर्व नाद सोडून दिला. आता तो इतका शांत झाला असून आईवडिलांचा आदर करु लागला असून आता स्वत:चा व्यवसाय करत आहे़ पालकांचे समुपदेशन यात महत्वाचे असते.
बालगुन्हेगारी रोखण्यास मुख्याध्यापकांची भूमिका महत्वाची : डॉ. के. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 6:37 PM
व्यसन, गुड टच बॅड टच, शिस्त आणि स्वांतत्र्य अशा विषयांवर त्यांनी मुलांना समुपदेश कसे करावे, याची माहिती
ठळक मुद्देविद्यार्थी सुरक्षितता कार्यक्रमात पोलीस आयुक्तांचे आवाहन