सणसरच्या पाणीपुरवठ्यासाठी सात कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:19 AM2021-03-13T04:19:52+5:302021-03-13T04:19:52+5:30

वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून सणसर हद्दीतील हिंगणवाडी येथे तेराशे लोकसंख्या असून १३१.६८ लाख रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर ...

Rs 7 crore sanctioned for Sansar water supply | सणसरच्या पाणीपुरवठ्यासाठी सात कोटी रुपये मंजूर

सणसरच्या पाणीपुरवठ्यासाठी सात कोटी रुपये मंजूर

googlenewsNext

वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून सणसर हद्दीतील हिंगणवाडी येथे तेराशे लोकसंख्या असून १३१.६८ लाख रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाले आहेत. भवानीनगर येथे ९६८ कुटुंबांकरिता २७४.१३ लाख रुपये तर सणसर गावठाणसाठी १७६४ कुटुंबसंख्यासाठी ३०१.३४ लाख रुपयांचा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सणसरला मिळाला आहे. यामुळे सणसर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी छत्रपतीचे संचालक डॉ. दीपक निंबाळकर, उपसरपंच राजश्री गुप्ते ,अभयसिंह निंबाळकर ,यशवंत पाटील , पार्थ निंबाळकर ,अमोल भोईटे, दिलीप भोईटे ,संजयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, ॲड विलास खटके, अशोक काळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

सणसर ग्रामपंचायतीला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेकरिता पाठपुरावा करण्यात आला होता. या योजनेमुळे सणसरच्या नागरिकांची पाण्याची सोय होणार आहे.

Web Title: Rs 7 crore sanctioned for Sansar water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.