पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात शनिवारी (दि.३) सकाळपासून नवे निर्बंध महापालिकेने लागू केले आहेत़ याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी रात्री काढले आहेत.
यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे़
* सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध
सदर आदेशाचा भंग केल्यास १ हजार रूपये दंड
* सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत पूर्णत: संचारबंदी़
यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा (दूध, भाजीपाळा,फळे) पुरवठा करणारे आस्थापना, व्यक्तींना, कोविड लसीकरणासाठी जाणाºया नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येणार आहे़ तसेच ज्या उद्योगांचे शिफटमध्ये कामकाज चालते अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात आले आहे़
* महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, स्विमिंगपूल, स्पा, व्यायामशाळा (जीम), क्रीडा संकुले पुढील सात दिवस किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे़
दरम्यान हॉटेलमार्फत पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री अकरापर्यंत सुरू राहील़ तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल (टपऱ्या) येथे अन्नपदार्थांचे सेवन न करता ते पार्सल घेऊन जाण्यास परवानगी राहील़
* शहरामध्ये सायंकाळी सहानंतर संचारबंदी असल्याने, मेडिकल सेवा वगळून अन्य सर्व दुकाने सायंकाळी ६ पूर्वीच बंद करावीत़
* पूर्वनियोजित लग्न समारंभ व अत्यंसंस्काराशी निगडित कार्यक्रम याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे़
* शहरातील सर्व धार्मिक स्थळे ७ दिवस व पुढील आदेशापर्यंत पूर्णंत: बंद राहील़
* सर्व आठवडे बाजार ७ दिवस व पुढील आदेशापर्यंत पूर्णंत: बंद राहिल़ मंडई मात्र सुरू राहील़
* पीएमपीएमएल बसेसवाही ७ दिवस व पुढील आदेशापर्यत पूर्णंत: बंद राहील़ (अत्यावश्यक सेवा वगळून)
* सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये ३० एप्रिल, २०२१ पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील. इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना यामधून वगळण्यात आले आहे़
--------------------------