पुणे (वानवडी) : नुकतेच जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला गवतात सोडून गेल्याची घटना उंड्री भागातील होलेवस्ती चौकात गुरुवारी रात्री घडली आहे. नवजात बाळ ही मुलगी असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करुन ससून रुग्णालयात नेण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास होलेवस्ती चौकात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तींना लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब ग्रामस्थ राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.गवतात टाकलेल्या त्या नवजात बालिकेला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी संकेत भिंताडे, पंकज कामठे, लक्ष्मण दिवेकर, प्रेम भिंताडे, अभिजीत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे यांनी रुग्णवाहिका व बाळाला दवाखान्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.डॉ. विनायक मासाळ यांनी प्राथमिक उपचार करत बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या साफ करुन दुध पाजले व ससून रुग्णालयात नेण्यात आले. या मुलीचा जन्म अवघे ३ ते ४ तासापूर्वी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बालिकेचे प्राण वाचले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहा. पोलीस निरिक्षक दादाराजे पवार हे बालिकेच्या आई वडिलांचा तपास करत आहेत.
रस्त्यावरील अनोळख्या व्यक्तींच्या हृदयाला 'ती'च्या रडण्याने पाझर फुटला;अन् त्या'नकोशी'ला पुन्हा नवा जन्म मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 3:04 PM
या मुलीचा जन्म अवघे ३ ते ४ तासांपूर्वी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ठळक मुद्देबालिकेचे प्राण वाचले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला