पुणे : शहर, परिसरात गेल्या वर्षभरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंगले, सोसायटी, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारात शिरून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत. कोरेगाव पार्क भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.याबाबत प्रमोद कमला राय (वय ५८, रा. समर्थनगर, आळंदी रस्ता, दिघी) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क भागात सागर चोरडिया यांचा बंगला आहे. बंगल्यात सोमवारी मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाची दोन झाडे करवतीचा वापर करून कापून नेली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार पडवळ तपास करत आहेत.
कोरेगाव पार्क भागातील बंगल्यात चंदन चोरी
By नम्रता फडणीस | Published: December 10, 2024 5:25 PM