संग्रामदुर्ग किल्ल्यात दिसला बिबट्या
By admin | Published: November 15, 2016 03:39 AM2016-11-15T03:39:30+5:302016-11-15T03:39:30+5:30
येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याजवळील पोलीस वसाहतीसमोर नागरिकांना बिबट्या आढळला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वती
चाकण : येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याजवळील पोलीस वसाहतीसमोर नागरिकांना बिबट्या आढळला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
काल दुपारी एक वाजता संग्रामदुर्ग किल्ल्याजवळ पोलीस वसाहतीसमोर काही मुलांना बिबट्यासदृश्य वन्यप्राणी आढळून आल्याने त्या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली होती. सर्पमित्र प्रफुल्ल गुरव व बाप्पू शेवकरी यांनी वन विभागाला कळविले. नंतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
ज्या मुलांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले, त्यांनी काढलेले फोटो वन कर्मचाऱ्यांना दाखवले. मात्र, ते अस्पष्ट होते. वनकर्मचाऱ्यांना आजूबाजूला कचरा व भटकी कुत्री आढळून आली. जवळूनच नाला वाहत आहे व किल्ल्याच्या खंदकात भरपूर झाडोरा आहे. त्यामुळे वन्यप्राण्याला लपायला भरपूर जागा आहे. वनविभागाने पाऊलखुणा शोधल्या. पण, गवत असल्याने त्या आढळल्या नाहीत. वन्यप्राणी आढळल्यास पुढील सूचना वनविभागाने दिल्या आहेत. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे यांच्या सूचनेनुसार नागरिकांनी जनजागृती केली व परिसराची परत पाहाणी केली.