लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तुंबलेले वॉशबेसीन, कचऱ्याने भरलेल्या पेट्या, अर्धवट तुटलेले दरवाजे, खिडक्यांच्या फुटक्या काचा, दुर्गंधी, गळके नळ, फ्लॅशर तुटलेले अशा अस्वच्छेत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील स्वच्छतागृहे अडकली आहेत. अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे असुरक्षितता आणि अनारोग्य, अशा दुहेरी कात्रित अडकल्याच्या भावना तरुणींनी व्यक्त केल्या. शहरातील नाट्यगृहांमधील स्वच्छतागृहांचा मुद्दा ऐरणीवर असताना महाविद्यालयातील स्वच्छतागृहांची अवस्थाही वेगळी नसल्याचे चित्र ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आढळून आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन, गरवारे, मराठवाडा मित्रमंडळ, एसपी कॉलेज, भारती विद्यापीठ अशा विविध महाविद्यालयांच्या स्वच्छतागृहांची ‘लोकमत’ प्रतिनिधींनी पाहणी केली. पावसामुळे तुंबलेले पाणी आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी अशी अवस्था बहुतांश स्वच्छतागृहांमध्ये पहायला मिळत आहे. स्वच्छतागृहांमधील कचºयाचे डबे अंत्यत छोटे असल्यामुळे कचरा बाहेर ओसंडून वाहत होता. बºयाच स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन हे डब्याच्या बाहेर, स्वच्छतागृहाच्या खिडकीत किंवा दरवाजामागे फेकले जाते. नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने तरुणींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्वच्छतागृहांमध्ये जाताना किळस वाटते, अशी व्यथा व्यक्त करतानाच तरुणींनीही याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.मराठवाडा मित्र मंडळ, गरवारे, बीएमसीसी महाविदायलय, पुणे विद्यापीठाच्या स्वच्छतागृहांतील दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. दरवाजाला कडी नसल्याने एकीला बाहेर उभे करुन दुसरीला आता जावे लागते. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या, पाण्याचा अभाव, गळके नळ, वॉश बेसीन तुंबलेले अशी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने दुर्गंधी पसरते. फ्लशरही तुटलेल्या अवस्थेत आढळले. मॉर्डन महाविद्यालयात उपहारगृहाजवळ स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ न केल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधाी पसरते. लेडीज रूमची अवस्था त्यापेक्षा काही चांगली नाही. काही महाविद्यालयांमध्ये लेडीज रूम संध्याकाळी ५ वाजल्यानंतर चक्क बंद केली जात असल्याने विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे.कात्रज येथील शिवाजी मराठा जेधे महाविद्यालयात शिक्षक व वरिष्ठ कर्मचा-यांची स्वच्छतागृहे वगळता विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकङे फारसे लक्ष दिले जात नाही. गळके नळ, नेहमीची दुर्गंधी, डास, माशांचा प्रादुर्भाव असे चित्र पहायला मिळाले. मुलींच्या स्वच्छतागृहांच्या भिंतीवर अश्लील संदेश, फोन क्रमांक देखील लिहिलेले असतात. कॉलेज प्रशासनाने यावर बरेचदा उपाय करुनही, स्वच्छता टिकण्याचे, समस्या कमी होण्याचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे.लेडीज रूममधील स्वच्छतागृहे कधीच स्वच्छ नसतात. स्वच्छतागृहांच्या दरवाजांची कडी व्यवस्थित लागत नाही. अनेकदा स्वच्छतेकडे लक्षही दिले जात नाही.- अक्षता पवार,फर्ग्युÞसन महाविद्यालयस्वच्छतागृहांतील कचºयाची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. अनेकदा कचरापेटीच्या बाहेर कचºयाचे ढीग लागतात. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे आवश्यक आहे.- प्रीती फुलबांधे, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयमहाविद्यालयातील स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरलेली असल्याने वापर करावासाच वाटत नाही. बाहेर जितके स्वच्छ आहे, तेवढी स्वच्छता बाथरूममध्ये नसते. कधीकधी पाण्याची सोयनसते.- विद्यार्थिनी,स.प महाविद्यालयपावसाळा असूनही आमच्या कॉलेजमध्ये महिला स्वच्छतागृहांची वेळेवर; साफसफाई केली जात नाही. काही स्वच्छतागृहांमध्ये पाणीदेखील नाही. कचरा टॉयलेटमध्येच फेकण्यात येतो. सतत रेस्टरूमच्या जमिनीवर पाणी सांडलेले असते.- विद्यार्थिनी, आबासाहेब गरवारे महाविद्यालयस्वच्छतागृहे खूप अस्वच्छ असतात. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते. त्यामुळे स्वच्छतागृहे वापरण्यायेग्य नसतात. वेळच्या वेळी साफसफाईदेखील होत नाही. या मूलभूत गोष्टींकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.- धनश्री नलावडे,पुणे विद्यापीठएकीकडे स्वच्छता अभियान राबिवले जात असताना दुसरीकडे त्याचे वाभाडे काढले जात आहे. महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडून भरगच्च शुल्क आकारतात. या पैशांचे काय केले जाते, असा प्रश्न पडतो. कॉलेजच्या स्वच्छतागृहांच्या भिंतींमध्ये पाणी झिरपून त्यावरचे पापुद्रे निघालेले आहेत. स्वच्छतागृहे छोटी, फुटलेल्या फरशा, नळाची गळती अशा समस्यांच्या गर्तेत विद्यार्थींनी अडकल्या आहेत. पावसाचे दिवस असतानाही स्वच्छता राखली जात नाही. सतत ओलावा असल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते.- विद्यार्थिनी, भारती विद्यापीठ, होमिओपॅथिक महाविद्यालय
अस्वच्छतेच्या गर्तेत अडकली स्वच्छतागृहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:36 AM