सारसबाग बंद, फक्त मंदिरात दर्शन सुरू; सकाळी ५ ते १२ व सायंकाळी ४ ते ९ दरम्यान मिळणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 11:04 PM2020-11-15T23:04:30+5:302020-11-15T23:05:42+5:30
Pune News : सारसबागेमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम टाळण्यासाठी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला.
पुणे - सारसबागेत नागरिकांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी गर्दी केल्याने कोरोनाबाबत शासनाच्या कोणत्याच नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेने
सारसबाग व हडपसर येथील लोहिया उद्यान अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. मात्र, सोमवारी पाडव्यापासून सारसबागेतील तळ्यातल्या गणपतीचे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
सारसबागेमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम टाळण्यासाठी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. प्रशासनाने जोपर्यत राज्य शासन १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात येण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत हे उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.
याबाबत देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरासमोरील दरवाजातून नागरिकांना एका बाजूने फक्त मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दर्शन घेतल्यानंतर दुसर्या बाजूने जायचे आहे. पाडव्यानिमित्त उद्या सोमवारी पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर उघडे राहणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून मंदिर सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ दरम्यान
मंदिर उघडे राहणार आहे. भाविकांनी मास्क, सोशल डिस्टंन्सिग पालन करुन सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.