शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

सारसबाग बंद, फक्त मंदिरात दर्शन सुरू; सकाळी ५ ते १२ व सायंकाळी ४ ते ९ दरम्यान मिळणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 11:04 PM

Pune News : सारसबागेमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम टाळण्यासाठी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला.

पुणे - सारसबागेत नागरिकांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी गर्दी केल्याने कोरोनाबाबत शासनाच्या कोणत्याच नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेनेसारसबाग व हडपसर येथील लोहिया उद्यान अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. मात्र, सोमवारी पाडव्यापासून सारसबागेतील तळ्यातल्या  गणपतीचे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.सारसबागेमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम टाळण्यासाठी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. प्रशासनाने जोपर्यत राज्य शासन १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात येण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत हे उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.याबाबत देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरासमोरील दरवाजातून नागरिकांना एका बाजूने फक्त मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दर्शन घेतल्यानंतर दुसर्‍या बाजूने जायचे आहे. पाडव्यानिमित्त उद्या सोमवारी पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर उघडे राहणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून मंदिर सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ दरम्यानमंदिर उघडे राहणार आहे. भाविकांनी मास्क, सोशल डिस्टंन्सिग पालन करुन सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस