मृत्यूचा दाखला देण्याकरिता सरपंचाने मागितली लाच; पुणे जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 01:52 PM2022-10-01T13:52:17+5:302022-10-01T13:52:56+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुणे जिल्ह्यात कारवाई

Sarpanch demanded bribe to issue death certificate; Type of Pune district | मृत्यूचा दाखला देण्याकरिता सरपंचाने मागितली लाच; पुणे जिल्ह्यातील प्रकार

मृत्यूचा दाखला देण्याकरिता सरपंचाने मागितली लाच; पुणे जिल्ह्यातील प्रकार

googlenewsNext

पुणे : चुलत आजी-आजोबा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता तसेच चुलत आजोबांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी केलेले मागणी अर्ज व हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्याकरिता कुसगाव खुर्द येथील सरपंचाने तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांच्या रकमेची लाच स्वीकारली. त्यांनी केलेल्या लाच मागणीस लोकसेवकाने प्रोत्साहन दिल्याने याप्रकरणी सरपंचासह ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

अनिल बाळू येवले (३३, सरपंच, कुसरगाव खुर्द, ता. मावळ, जि. पुणे) व अमोल बाळासाहेब थोरात (३४, ग्रामसेवक कुसगाव खुर्द ग्रामपंचायत, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणाने ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांच्याकडे दाखले मिळण्याकरिता २६ सप्टेंबरला अर्ज केला होता. मात्र सरपंचांनी दाखले देण्याकरिता लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांनी दाखले देण्याकरिता १० हजार रुपयांची मागणी करून तडजोआडीअंती ८ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. लाचेच्या मागणीस ग्रामसेवक थोरात यांनी प्रोत्साहन दिले. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.

Web Title: Sarpanch demanded bribe to issue death certificate; Type of Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.