पुणे : ससून रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा सातत्याने वाढत असून मागील वर्षी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच आंतररुग्ण विभागातील रुग्ण आणि शस्त्रक्रियांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. गरजु-गरीब रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांकडूनही ससूनला पसंती मिळू लागली आहे.ससून रुग्णालयामध्ये मागील काही वर्षांत आमुलाग्र बदल झाले आहेत. पुर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी येत होते. मात्र, आता सोयी-सुविधांमध्ये झालेली वाढ, विविध सेवांचा वाढलेला दर्जा, विश्वासार्हता यांमुळे मध्यवर्गीयही ससूनकडे आकर्षित होऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या विविध भागातून ससून रुग्णालयामध्ये रुग्ण येवू लागले आहेत. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २०१५ मध्ये सुमारे ६ लाख ४१ हजार रुग्ण आले होते. हा आकडा २०१७ मध्ये सात लाखांच्या पुढे गेला असून वर्षभरात सुमारे ७ लाख ८ हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. रुग्णालयामध्ये एकुण १४९६ खाटांची क्षमता आहे. मागील वर्षभरात आंतररुग्ण विभागामध्ये सुमारे ७८ हजार रुग्णांनी उपचार घेतले. २०१५ मध्ये ही संख्या ६२ हजार ९३२ एवढी होती. रुग्णालयात होणाºया विविध शस्त्रक्रियांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७ मध्ये सुमारे ५७ हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार दररोज दिडशेहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २०१५ मधील शस्त्रक्रियांची संख्या केवळ १९ हजार ६५१ एवढी होती. रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये वर्षभरात तब्बल ११ लाख ४० हजार रक्त तपासण्या करण्यात दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या खुप वाढली आहे. रुग्णालयामध्ये वाढणाºया रुग्णसंख्येबरोबरच सोयी-सुविधा वाढविण्याचा प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. खासगी कंपन्या, सामाजिक संस्थांकडूनही त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे रुग्णालयातील विविध सेवांचा दर्जा उंचावू लागला आहे.—————-——————-
ससून रुग्णालयाने वर्षभरात ओलांडला बाह्यरुग्णांचा ७ लाखांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:47 PM
सोयी-सुविधांमध्ये झालेली वाढ, विविध सेवांचा वाढलेला दर्जा, विश्वासार्हता यांमुळे मध्यवर्गीयही ससूनकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
ठळक मुद्देगरजु-गरीब रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांकडूनही ससूनला पसंती दररोज दिडशेहून अधिक शस्त्रक्रिया