ससूनच्या वरिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडले
By Admin | Published: September 12, 2016 10:09 PM2016-09-12T22:09:16+5:302016-09-12T22:09:16+5:30
ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला १ हजार ४०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला १ हजार ४०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. सोमवारी वैद्यकीय अधिक्षक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
संजय लक्ष्मण रसाळे असे या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसाळे हा ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपीक आहे. दरम्यान तक्रार यांच्या पत्नीवर ससून रुग्णालयात उपचार झाले होते. त्याचे बिल तपासून मंजूर करायचे होते. ते बिल त्यांनी अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. मात्र, आरोपी रसाळे यांने बिल मंजून करण्यासाठी त्यांच्याकडे 1 हजार 600 रुपयांची लाचेची मागणी केली.
त्यावेळी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. लाच लुपचपत विभागाने याची पडताळणी केली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी तक्रारदाराकडून तडजोडीअंती 1 हजार 400 रुपयांची लाच घेतना लाच लुचपत प्रतिबंधंक पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.