दौंड : येथील स्व. लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब वागसकर, अनिल जाधव यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजय वाघ यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक अशोक भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अनिल जाधव, विद्यार्थी उपस्थित होते. स्व. आसुदामल नारंग प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शिक्षिका दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रजनी हिरणावळे यांनी स्वीकारले. यानंतर सर्व प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या वतीने सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिभा चौगुले, शाहिद शेख, हमरीन शेख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शाळेतील उपशिक्षिका स्वाती लोखंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शहाबाज शेख यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली निडोनी यांनी अनुमोदन केले. स्वाती लोखंडे यांनी आभार मानले. संतोष चव्हाण, महेंद्र शितोळे, पंकज सोनवणे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)४नंदादेवी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबार्इंचा पेहराव करून मिरवणुकीत सहभाग घेतला. शाळेतील विद्यार्थिनींनी संपूर्ण दिवस शाळेत अध्यापन केले. ४सरपंच सुनीता चव्हाण, उपसरपंच स्वाती आटोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता आटोळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ४विद्यार्थिनी दिव्या आटोळे, प्रीती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रीती आटोळे हिने आभार मानले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाबर, ग्रामसेवक डी. बी. परदेशी, सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजूभाई आत्तार, सुरेंद्र चोरमले, अमोल लांभाते, सुनील बोऱ्हाडे, संतोष निगडे, विकास काळे यांनी केले. ४कुरकुंभ : पांढरेवाडी (ता.दौंड) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन व महास्वच्छता दिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या वेळी उत्स्फूर्तपणे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पांढरेवाडी येथे विविध ठिकाणांहून प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती संदेश देण्यात आला. सावित्रीबाई फुलेंच्या वेषभुषेतील विद्यार्थिनी आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या, तर वक्तृत्व स्पर्धेद्वारेदेखील सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर विद्यार्थिनींनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.४पांढरेवाडीचे उपसरपंच हनुमंत चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मी निंबाळकर, भिकाजी भागवत, ग्रामपंचायत सदस्य मनोहर जाधव, तृप्ती निंबाळकर, पोलीस पाटील विलास येचकर, शालेय व्यवस्थापन समितीचे संतोष भागवत, राजू भागवत, कल्पना गदादे, शोभा तोरडमल, बाळकृष्ण भागवत, ग्रामसेवक संतोष निंबाळकर, शिक्षक शफीक मणियार व पालक वर्ग उपस्थित होता. ४याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ परिसर याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या दरम्यान सर्व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ग्रामस्वच्छता केली. ४कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ या ठिकाणी जयंती उत्सव विविध सामाजिक कार्यक्रमांनी झाला. सर्वत्र स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात करून समाजात स्त्रियांच्या विविध समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आव्हान करण्यात आले.