कसा करावा अर्ज :
राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in , https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह आयुक्त, समाज कल्याण (शिक्षण शाखा), 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य , पुणे- ४११००१ या पत्यावर संपर्क साधणे अपेक्षित आहे. दरवर्षी साधारण आॅगस्ट /सप्टेबर महिन्यात याबाबत जाहिरात प्रसिध्द केली जाते.
शिष्यवृत्तीतून मिळणारे लाभ : - राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानप्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळतो.
शैक्षणिक पात्रता :- पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळते शिष्यवृत्ती :-
१ ) पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी
२) पदव्युत्तर पदवी ३ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी
३) पदव्युत्तर पदविका २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी
शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय विभागणी :-
अक्र. शाखा / अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी डॉक्टरेट
(पीएचडी)
1. कला ०२ ०४
2. वाणिज्य ०२ ०४
3. विज्ञान ०२ ०५
4. व्यवस्थापन ०८ ०५
5. अभियांत्रिकी २५ ०६
6. वैद्यकीय ०३ ०२
7. विधी ०५ ०३
एकूण ४७ २८
----------------------------
अनिवार्य अटी : -
१ ) पात्र उमेदवाराने विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक आहे.
२) उमेदवाराने २ जामीनदार देणे बंधनकारक आहे.
३)उमेदवारास / विद्यार्थ्यास शासनाने विहीत करुन दिलेल्या नमुन्यात रेकॉर्ड रिलिस फॉर्म हा बंधपत्राच्या स्वरुपात द्यावा लागतो.
४) परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी स्वत: प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन असल्यास विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले असले पाहिजे.
६) पासपोर्ट, व्हिसा मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.
योजनेसाठी संपर्क : मा. आयुक्त, समाज कल्याण (शिक्षण शाखा), ३ , चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ ०२०-२६१२७५६९
- शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, सामाजिक कल्याण, पुणे विभाग