दुसरीची पुस्तकेही चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:01 AM2017-08-11T04:01:21+5:302017-08-11T04:01:21+5:30

बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकांतील चुकांपाठोपाठ आता दुसरीच्या पुस्तकांमधील चुकाही चव्हाट्यावर आल्या आहेत. दुसरीच्या मराठीच्या पुस्तकात तब्बल आठ धडे पुन्हा छापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

 Second book in the investigation round | दुसरीची पुस्तकेही चौकशीच्या फेऱ्यात

दुसरीची पुस्तकेही चौकशीच्या फेऱ्यात

Next

पुणे : बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकांतील चुकांपाठोपाठ आता दुसरीच्या पुस्तकांमधील चुकाही चव्हाट्यावर आल्या आहेत. दुसरीच्या मराठीच्या पुस्तकात तब्बल आठ धडे पुन्हा छापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक २४ ते ३१ पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तिसरीप्रमाणे ही पुस्तकेही जुन्नर तालुक्यातील शाळांमध्ये आढळली आहेत. याबाबत जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी तक्रार केली आहे. दुसरी आणि तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील चुका शिक्षकांच्याही निदर्शनास आल्या नाहीत. मुलांनीच वर्गशिक्षकांना ही चूक दाखवून दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
बार्इंडिंगमधील त्रुटींमुळे चुका होतात. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ही सर्व पुस्तके बदलूनही दिली जातात. त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले.

Web Title:  Second book in the investigation round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.